जूनअखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राइव्ह 12 मिनिटांत

मुंबईकरांचा (mumbai)प्रवास वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंक जोडणारा दुसरा महाकाय गर्डर आज पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी यशस्वीरीत्या बसवण्यात आला. आता कोस्टल रोडचे शिल्लक काम वेगाने करण्यात येणार असून जूनअखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या बारा मिनिटांत होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारा ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून सुमारे 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडला गेला आहे. मुंबई (mumbai)किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयारी केली.


कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) 24 एप्रिल रोजी दुपारी 12.30 मिनिटांनी माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली आणि 25 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतूजवळ पोहोचली. शुक्रवारी पहाटे सव्वा तासात बो स्ट्रिंग आर्च गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आला. महाकाय गर्डर स्थापित करण्याचे काम फ्रेट विंग्स प्रायव्हेट लिमिटेड पंपनीच्या सहकार्याने करण्यात आले.

 दुसऱया टप्प्यातील बो स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवार, 15 मे रोजी पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी बसवण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत. या प्रकल्पातील टप्पा असलेल्या 136 मीटरच्या सर्वात मोठय़ा बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिह्यातील न्हावा येथे करण्यात आली. हा महाकाय गर्डर न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळी येथे आणला गेला आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

आजचे राशी भविष्य (14-05-2024)

तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश