इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

इचलकरंजी येथील गणेशनगरमधील राकेश धर्मा कांबळे (वय ३२) या तरुणाचा(youth) टोळक्याने पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण राकेश कांबळे खून केला. ही घटना पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

यावेळी दोन मोटरसायकलींची दगड घालून(youth) तोडफोड करण्यात आली.प्रेमप्रकरणातून खुनाची घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर गणेशनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भारतमाता हाऊसिंग सोसायटीसमोरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत राकेश कांबळे व हल्लेखोर यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी राकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली.

जीव वाचवण्यासाठी राकेशने पळ काढला मात्र त्याचा पाठलाग करून टोळक्याने त्यास मारहाण केली. पाठ, पोटावर शस्त्राने वार केल्याने राकेश गंभीर जखमी झाला. त्यास इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संतप्त जमावाने दोन मोटरसायकलींची दगड घालून तोडफोड केली.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते. घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती. राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करीत होता.

हेही वाचा :

मध्यवर्ती कारागृह असूनही “कळंबा”सतत चर्चेत का?

‘महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..’, सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?

मतदार यादीतून नावे गायब; हातकणंगलेतील मतदार प्रशासनाला खेचणार कोर्टात