संविधान बदलण्याच्या भूमिकेवर मोदी गप्प का? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

काँग्रेसने(congress) देशाला खूप काही दिले. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य दिले, जवाहर लाल नेहरू यांनी लोकशाहीचा पाया रचला तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, परंतु भाजप नेते हे संविधानच बदलून टाकण्याची भाषा करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना केला आहे. आमच्याकडे याबद्दलचा पुरावा नाही, परंतु पहिल्यांदा सरसंघचालक मोहन भागवत यांनीच आमची सत्ता आल्यावर संविधान बदलण्याबद्दल सांगितले होते. उत्तर प्रदेशात तर भाजप नेत्यांनी सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली, असा आरोपही खरगे यांनी केला.

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.(congress)

भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा सातत्याने करत आहेत, परंतु हा देश, संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा विषय आहे, यावर मोदी गप्प का आहेत, असा सवाल खरगे यांनी केला आहे. चार टप्प्यांतील मतदानानंतर इंडिया आघाडीची स्थिती अतिशय मजबूत असल्याचे खरगे म्हणाले. जनताच मोदींना घालवेल आणि 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


पेपर लीकचा मुद्दा चिंतेचा मुद्दा असून भाजपच्या राज्यात तरुणवर्ग आणि पालकवर्ग अतिशय हैराण आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती ज्यांना प्रेम आहे, आस्था आहे त्यांनी संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही अखिलेश यादव यांनी जनतेला केले.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट

सांगलीतील 80 गावे टंचाईग्रस्त, 73 टँकरने पाणीपुरवठा

काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा