आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील म्हाडांच्या घरांची संख्या १०० ने वाढवलीय. म्हाडाने या घरांसाठी जाहीरात काढताना ८ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया (pyrolysis)सुरू केली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती.

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडा पुणे मंडळाने गेल्या महिन्यात वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्ज करण्याची मुदतही संपली होती,मात्र आता काही लोकांना या घरांसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलीय. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढवलीय. म्हाडाने या घरांसाठी जाहीरात काढताना ८ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती. मात्र त्यानंतर नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केल्यानंतर आता अर्जदार ३० मे २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

ही बातमी वाचा: 

मोदी तर झोळी घेऊन निघून जातील, 4 जूननंतर तुमचं काय होणार?

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा ‘टॅक्स’संदर्भात मोठा निर्णय

कमळाला मतदान केलं म्हणून कुटुंबाला बेदम मारहाण