गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अवैध्य दारुची विक्री(alcohol delivery) केली जात होती. येथील पोलिसांनी वेळोवेळी अवैध दारुसाठा जप्त करुन कारवाईही केली.
गडचिरोली: नक्षलग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सिनेस्टाईल कारवाई केल्याचं दिसून आलं. जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे आदेशान्वये पोस्ट गडचिरोली हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती.(alcohol delivery) त्यानुसार गडचिरोली येथील सन 2017 ते 2023 या कालावधीतील दाखल एकुण 510 गुन्ह्यामधील मुद्देमाल महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये एकुण 1,35,79,336/- (अक्षरी:- एक कोटी पसतीस लाख एकोनएैंशी हजार तीनशे छत्तीस) रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. रईस चित्रपटातील सीनप्रमाणेच गडचिरोली पोलिसांनी चक्क बुलडोझर चालवून दारुच्या बाटल्यांचा नायनाट केल्याचं दिसून आलं. पोलिसांनी केलेली ही कारवाई सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अवैध्य दारुची विक्री केली जात होती. येथील पोलिसांनी वेळोवेळी अवैध दारुसाठा जप्त करुन कारवाईही केली. मात्र, जप्त करण्यात आलेला दारुसाठी सध्या पोलिसांच्याच ताब्यात होता. विशेष म्हणजे 2017 ते 2023 पर्यंतचा म्हणजे तब्बल 6 वर्षांपासूनचा हा मद्यसाठा पोलिसांनी एका दिवसांत समूळ नष्ट केला. या दारुसाठ्याची किंमत 1 कोटी 35 लाख 80 हजार एवढी होती. पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत आहे. बुलडोझरखाली बाटल्या तुटवत हा दारुसाठा नष्ठ करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिसांनी नष्ट केलेल्या दारुच्या साठ्यात 1) देशी दारुच्या 90 मिली मापाच्या 110212 प्लास्टीक बाटल्या 2) विदेशी दारुच्या 200 मिली मापाच्या 27 प्लास्टीक बाटल्या 3) विदेशी दारुच्या 750 मिली मापाच्या 101 काचेच्या बाटल्या 4) विदेशी दारुच्या 375 मिली मापाच्या 87 काचेच्या बाटल्या 5) विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या 17176 काचेच्या बाटल्या 6) बिअरच्या 650 मिली मापाच्या बियरच्या 23 काचेच्या बाटल्या 7) बिअरच्या 500 मिली मापाच्या बियरच्या 790 टिनाचे कॅन याप्रमाणे एकुण 1,35,79,336/- (अक्षरी:- एक कोटी पसतीस लाख एकोनएैंशी हजार तीनशे छत्तीस) रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने केले नष्ट करण्यात आला आहे.
हेही वाचा
ही बातमी वाचा:
सांगोल्यात चोरी! २ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
बापभररस्त्यात धावत्या बाईकनं अचानक घेतला पेट
आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण