बापभररस्त्यात धावत्या बाईकनं अचानक घेतला पेट

उन्हाळा आला की कारला, बाईकला आग (fire)लागण्याच्या घटनांच्या बातम्या कानावर पडू लागतात. काही ठिकाणी अपघातामुळे कारला आग लागते, तर काही वेळा अचानक धावत्या कारला, बाईकला आग लागते. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अशी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत, आता असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चालत्या बाईकला आग लागल्याचे दिसून येत आहे. या घटनेत बाईक पूर्णपणे जळून खाक झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कधी पुढे काय होईल, याचा काहीचं थांगपत्ता लागत नाही. आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना या घडत असतात त्यामुळे आपण अजूनच सतर्क होतो.(fire) परंतु सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती साधारणपणे रस्त्यावरून बाईक चालवत आहे. मात्र, थोडं पुढे गेल्यावर बाईकला अचानक आग लागते. आग लागताच काही वेळातच दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीवर असणारी बॅगला ही आग लागते आणि त्यानंतर आग लागताच ती व्यक्ती आपल्या बाईकचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करते आणि तात्काळ बाईकवरुन खाली उडी घेते.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या व्यक्तीच्या दुचाकीला आग लागली आणि त्यानंतर त्याची बॅगही आगीत जळाली आणि बॅगेत ठेवलेला फोन आणि इतर वस्तूही रस्त्यावर पडल्याचे दिसते. यावेळी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी कोणीही पुढे येताना दिसले नाही. सुदैवाने त्या व्यक्तीला काहीही झाले नाही, मात्र त्याची दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.

हा व्हिडीओ X वर @crazyclipsonly नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ४८ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला, तर १३ हजारांहून अधिक लोकांनी त्याला पसंती दिली. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. एकाने कमेंट केली की, “मी पहिल्यांदाच असा व्हिडीओ पाहिला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने चालत्या बाईकला आग लागल्यावर उडी मारून आपला जीव वाचवला.” दुसऱ्याने कमेंट केली की, बाईकचा वेग खरोखरच खूप जास्त होता.”

ही बातमी वाचा: 

आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

मोदी तर झोळी घेऊन निघून जातील, 4 जूननंतर तुमचं काय होणार?

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा ‘टॅक्स’संदर्भात मोठा निर्णय