मुंबईत मोदींची अनधिकृत होर्डिंग्ज उभारून आचारसंहिता भंग

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत (mumbai)17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने दादर-माहीम तसेच मुंबईत अनेक ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांकडून मोदींची अनधिकृत हार्ंडग्ज उभारून आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहे. त्यामुळे ही हार्ंडग्ज तत्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपच्या प्रचारानिमित्त 17 मे रोजी शिवतीर्थ, दादर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेनिमित्त दादर-माहीम परिसरात तसेच मुंबईत(mumbai) इतरही अनेक ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे हार्ंडग्ज आणि कटआऊटस् सार्वजनिक जागांवर अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले असून हा आदर्श आचारसंहिता नियमावलीनुसार ‘सार्वजनिक जागांचे विद्रूपीकरण व मतदारांवर अवैधरीत्या प्रलोभन’ टाकण्याचा प्रकार असल्याची तक्रार शिवसेना पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.
आयोगाचे मुक्त व पारदर्शक निवडणुका हे अंतिम ध्येय आहे. यामुळे आदर्श आचारसंहिता नियमावलीचा भंग करणारी मोदींच्या सभेच्या निमित्ताने उभारण्यात आलेली अनधिकृत हार्ंडग्ज आणि कटआऊटस् तत्काळ हटविण्याचे आदेश पालिका प्रशासनास व संबंधित निवडणूक अधिकाऱयांना देण्यात यावेत, अशी मागणी परसनाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनधिकृत होर्डिंग्ज आणि कटआऊट्स संदर्भात शिवसेनेने मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे केलेल्या तक्रारीची दखल निवडणूक विभागाकडून घेण्यात आली आहे. तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत नियमानूसार तत्काळ कारवाई करून अहवाल देण्यात यावा, अशा सूचना विक्रम निकम अवर सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू; अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या

शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री

आठ वर्ष पत्नीने स्पर्श करु दिला नाही…आता प्रसिद्ध कलाकार भाजपकडून निवडणूक मैदानात