मिरजेत महात्मा गांधी चौकात एकावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात (police) देण्यात आली आहे. जखमीस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस | पुढील कारवाई करीत आहेत. महात्मा गांधी चौकातील जोशी पेट्रोल पंप या ठिकाणी ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात स्वप्नील सचिन आवळे (वय २३, रा. अंबिका नगर, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, मिरज) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोयत्याने त्याच्या | डोक्यात, पोटावर, मांडीवर वार करण्यात आले आहेत. या प्रकरणी प्रेम | संजय पाटील (वय २२, रा. भारत नगर) यांनी पोलिसात (police) फिर्याद दिली | असून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलिसात (police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी प्रेम पाटील यांचा मित्र जखमी स्वप्निल आवळे आणि त्यांच्या ओळखीचा | अल्पवयीन संशयित मोपेड गाडीवरून महात्मा गांधी चौक येथील जोशी पेट्रोल पंपावर आले. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन संशयीताने स्वप्निल आवळे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने डोक्यात, पोटावर आणि मांडीवर वार केले. यामध्ये स्वप्निल आवळे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल | केला आहे. जखमी स्वप्निल आवळे याच्यावर खाजगी रुग्णालयात | उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :
गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह
केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार का हसले ?
दहावी-बारावीच्या निकाला बाबत मोठी अपडेट