टॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या(accident) करत आपले जीवन संपवले आहे. चंद्रकांत याची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री पवित्रा जयराम हिचा काही दिवसांपू्र्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणाच्या अलकापूरतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. चंद्रकांत याच्या मृत्यूने तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये हळळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत हा टेलिव्हिजन अभिनेता होता. चंद्रकांतची तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘चंदू’ नावाने(accident) ओळख होती. त्याला ही ओळख ‘त्रिनयनी’ सीरियलमधून मिळाली होती. त्या मालिकेत पवित्रा आणि चंद्रकांतने एकत्र काम केले आहे.
त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “पवित्राच्या मृत्यूमुळे तो तणावात होता. तो त्या तणावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत होता.” चंद्रकांत आणि पवित्राचं गेल्या सहा वर्षांपासून एकत्र राहत होते. चंद्रकांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रकांतला पवित्राच्या मृत्यूमुळे धक्का बसला. पवित्रा आणि चंद्रकांत हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्यात भावनिक संबंध होते. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने पवित्रासाठी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्टही शेअर केली होती.
हेही वाचा :
घटस्फोटाची चर्चा असतानाच रणवीर सिंहची ‘ती’ पोस्ट, सर्वांना दिला धक्का
कोल्हापूर-हातकणंगलेचा कल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार?
‘४ जूनला आमच्या शपथविधीला या’; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण