“एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले…” थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यात(retirement) संपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या गटातील सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई आणि आरसीबी या दोघांचे समान 14 गुण होते, परंतु आरसीबी चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला.

दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा(retirement) दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. खरं तर, धोनी 42 वर्षांचा आहे आणि काही सामन्यात तो लंगडत असल्याचे पण दिसले. अशा परिस्थितीत धोनी आता आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

निवृत्तीच्या बातम्या येत असताना धोनी रांची येथील त्याच्या घरी पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने अद्याप फ्रँचायझीला त्याच्या भविष्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याने संघ व्यवस्थापनाला काही महिने प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे.

सीएसकेशी संबंधित एका सूत्राने ही माहिती दिली आहे. तो म्हणाला, ‘धोनी निवृत्ती बद्दल काही बोला नाही. पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचे धोनीने व्यवस्थापनाला सांगितले आहे.

धोनीचे एक स्वप्न अपूर्ण राहिले आहे. खरं तर, थलाला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळायचा होता. चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असता तर तो हे करू शकला असता, पण सीएसके लीग स्टेजमधूनच बाहेर पडला, त्यामुळे धोनीचे स्वप्नही अधुरे राहिले. अशा परिस्थितीत धोनी निवृत्तीचा विचार सोडून पुन्हा एकदा सुपर किंग्जच्या जर्सीवर पुढील आयपीएल हंगाम खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

या हंगामात धोनीने सीएसकेसाठी 14 सामन्यांमध्ये 11 डावात फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने 53 च्या सरासरीने आणि 220 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा जोडल्या. धोनीने आयपीएल 2024 मध्ये 14 चौकार आणि 13 षटकार मारले होते.

हेही वाचा :

महाराष्ट्रात सोन्यासह चांदीचे दर गडगडले….

डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

मनातील भीती काढण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या