एका कोंबड्यानं घेतला ३ जणांचा जीव; विहिरीत सापडले तिघांचे मृतदेह

आसाममधील एका गावात कोंबड्यामुळे तीन जणांचा जीव गेल्याची घटना घडलीय. कोंबड्याला(lives) पकडायला गेलेल्या तीन जणांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आलाय.आसाममध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. येथील कछार जिल्ह्यातील एका गावात एका कोंबड्यानं तीन तरुणांचा जीव घेतल्याची समोर आलंय. अशा विचित्र घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ माजलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कोंबड्याला पकडण्यासाठी एका लहान मुलाने घराजवळील छोट्या विहिरीत उडी मारली. पण बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर आला नाही म्हणून त्याला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या मोठ्या भावाने विहिरीत उडी मारली. पण तोही बाहेर न आल्याने एका स्थानिक युवकाने विहिरीत उडी मारली. हे तिघेही(lives) पुन्हा बाहेर आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिघांचा शोध घेतल्यानंतर या तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे एका कोंबड्यामुळे ३ जणांचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब दोघे भाऊआणि अमित सेन अशी मृत (lives)पावलेल्या तरुणांची नावे आहेत. कछार जिल्ह्यातील लखीमपूर ही घटना घडलीय. येथील देब कुटुंबाने कोंबड्या पाळल्या होत्या. त्यातील एक कोंबडा अचानक विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील दोन भाऊ मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब हे दोघे विहिरीत उतरले. पण खूप वेळ झाल्यानंतरही हे दोघं वरती आले नाहीत तेव्हा त्याच्या शेजारी असलेल्या अमित सेन नावाचा स्थानिक युवकानेही विहिरीत उडी मारली. पण ते तिघेही वरती आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?