सावधान! महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस ९ जिल्ह्यांना अलर्ट

येत्या ३-४ तासांत अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, (districts)रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या ३-४ तासांत अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो.

दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये(districts) नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज बुधवार आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाच्या सरी, तर कुठे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ आहे. तापमानाचा पारा चाळीपार गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे.

मंगळवारी जळगाव येथे सर्वाधिक तापमानाची ४३.९ सेल्सिअस नोंद झाली. (districts)दुसरीकडे साताऱ्यात सर्वात कमी २१ अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले गेले. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अशंतः ढगाळ आणि दुपार /संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २९°C च्या आसपास असेल. दुसरीकडे दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?

माढ्यात तुतारीच शेतकरी 11 बुलेटची पैज लावायला तयार, भाजपाकडून चॅलेंज कोण स्वीकारणार?