अमित शाहांचे गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीत काही दिवसांपुर्वीच शाळा व रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात (ministry)आली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणेची चांगली धावपळ उडाली होती.मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली बॉम्बच्या धमकीने चांगलीच हादरली आहे. शाळा, रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणाही कामाला लागल्या होत्या. पण याठिकाणी संशयास्पद काहीच आढळून आले नव्हते. आता बुधवारी पुन्हा दिल्लीत खळबळ उडाली आहे. यावेळी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाला टार्गेट करण्यात आल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

दिल्लीत गृह मंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉक इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांसह अग्निशमन विभाग, डॉग स्कॉड आदी पथकांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नॉर्थ ब्लॉकमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल(ministry) आला होता. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा कॉल होता. शोधमोहिम सुरू असून आतापर्यंत काहीही हाती लागलेले नाही.’ नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयासह अनेक महत्वाची मंत्रालये आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राजधानी दिल्लीतील शाळा आणि रुग्णालयांमध्ये बॉम्ब (ministry)असल्याच्या धमकीचे ई-मेल आले होते. 150 हून अधिक शाळांचा त्यामध्ये समावेश होता. ई-मेल आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवून पोलिस यंत्रणेला सतर्क केले होते. एकाचवेळी एवढ्या शाळांना धमकी आल्याने तपास यंत्रणांची दमछाक झाली होती.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?

माढ्यात तुतारीच शेतकरी 11 बुलेटची पैज लावायला तयार, भाजपाकडून चॅलेंज कोण स्वीकारणार?