मृतांचा आकडा 17 वरघाटकोपर दुर्घटनेच्य चौकशीसाठीनऊ दिवनंतरएसआयटी

घाटकोपर छेडानगर बेकायदा होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा(death) आकडा आज 17 वर गेला असताना दुर्घटनेच्या तब्बल नऊ दिवसांनंतर गुन्हे शाखेने विशेष तपास (एसआयटी) ची स्थापना केली आहे. ‘एसआयटी’च्या पथकाने भिंडेच्या कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच पोलिसांचे पथक माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट येथे होर्डिंगचा एक नमुना घेऊन गेले होते. त्या नमुन्याचा अहवाल आल्यावर आणखी काही बाबी समोर येणार आहेत.

मुंबईत 13 मे रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे छेडानगर पेट्रोल पंपाजवळ आसऱयासाठी उभे राहिलेल्या 100 जणांवर महाकाय होर्डिंग कोसळले होते. यामध्ये आतापर्यंत 17 मृत्यू,(death) तर 97 जण मृत्यू पावले होते. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता. शिवाय पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या दुर्घटनाप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, तर या गुह्यात फरार असलेल्या भावेश भिंडेला क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने अटकही केली. होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त विशाल ठापूर यांच्या पथकातील युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे हे नेतृत्व करणार आहेत. पोलिसांनी भिंडेच्या मुलुंड येथील कार्यालयातील तीन जणांचे जबाब नोंदवले आहे. भिंडेने त्या होर्डिंगचे आऊट सोर्सिंग केल्याचे समजते. त्या आऊट सोर्सिंगला त्याला काही पैसे येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस आता भिंडेच्या व्यवसायाची आर्थिक बाजूदेखील तपासणार आहेत.

‘व्हीजेटीआय’कडून नमुन्यांची तपासणी

तपासादरम्यान पोलिसांचे पथक आज माटुंग्याच्या व्हीजेटीआय येथे होर्डिंगच्या बांधकामाचे नमुने घेऊन गेले होते. ते नमुने तपासणीसाठी व्हीजेटीआय येथे दिले आहेत. व्हीजेटीआयमध्ये नमुने तपासल्यावर त्याचा अहवाल पोलिसांना दिला जाईल. त्या अहवालाच्या आधारावर पोलीस पुढील कारवाई करणार असल्याचे समजते.

दहा जणांवर अजूनही उपचार

होर्डिंग दुर्घटनेतील जखमी राजू सोनवणे (52) यांच्यावर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसादही मिळत होता. मात्र अखेर प्रपृती खालावत जाऊन त्यांचा आज मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. या दुर्घटनेत 97 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर 10 जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी व परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?