बाळाच्या ओढीने रात्री झोप(sleep) लागत नाही. बाळ झोपले असेल ना. दुधासाठी रडत नसेल ना, असे विविध विचार वारंवार मनात येतात. माझे बाळ मला परत द्या. दत्तक प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका एका महिलेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
अॅड. वर्षा भोगले यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. दत्तक प्रक्रियेसाठी भरून दिलेला अर्ज दोन महिन्यांत मागे घेण्याची तरतूद आहे. अर्ज भरून दोन महिने झालेले नाहीत. ही प्रक्रिया रद्द करून बाळ परत देण्याचे आदेश न्यायालयाने बाल कल्याण समितीला द्यावेत, अशी मागणी अॅड. भोगले यांनी केली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने समितीला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.(sleep)
याचिकाकर्ती 23 वर्षीय सिंगल मदर आहे. मार्च 2024मध्ये तिची प्रसूती झाली. त्यानंतर ती आशा सदन निवारागृहात होती. बाळ दिवसभर झोपलेले असते. रात्री जागे असते. बाळ अवघे दोन महिन्यांचे आहे. त्याला दुधाची गरज आहे. आशा सदनमध्ये बाळाची काळजी घेतली जात असेल का? त्याला वेळेवर दूध मिळत असेल का? ते रडतंय का? या विचारांनी मला रात्रभर झोप लागत नाही. दूध बंद होण्याचे औषध घेतले. तरीही दूध थांबत नाही. कदाचित माझे बाळ उपाशी असेल, अशी या महिलेची भावना आहे.
काय आहे प्रकरण…
याचिकाकर्ती महिला पनवेल येथे राहते. दुबईत कामाला असताना वरिष्ठांनी तिचा लैंगिक छळ केला. तेथून ती भारतात परतली. गरोदर असल्याचे सुरुवातीला कळले नाही. पोटाच्या व्याधीसाठी डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. तेव्हा सहा महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी तिला धक्का बसला. महिला जे.जे. रुग्णालयात गेली. प्रसूती झाल्यानंतर ती आशा सदन येथे गेली. तेथे तिने बाळ दत्तक देण्यासाठी अर्ज भरला. नंतर तिने निर्णय बदलला. बाळ परत देण्याची विनंती केली. तिला कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगितले. आशा सदन व समितीच्या कार्यालयात तिने फेऱया मारल्यानंतर अखेर बाळ परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली.
बाळाला बाथरूममध्ये ठेवतात, आशा सदनवर गंभीर आरोप
प्रसूतीनंतर मला आशा सदनने खूप आधार दिला. तेथील काही कर्मचारी चांगले आहे. पण बाळांची काळजी घेणाऱया काही मावशींचे वर्तन योग्य नाही. रात्रपाळीला असणाऱया मावशी त्यांना नीट झोपता यावे म्हणून रडणाऱया बाळांना त्या बाथरूममध्ये ठेवतात, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मावशी बाळांची नीट काळजी घेत नाहीत. माझ्या बाळाची मला सतत काळजी वाटते, अशी भीती महिलेने याचिकेत व्यक्त केली आहे
हेही वाचा :
महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला
खरंच परिणीती चोप्रा प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?