मुस्लीम कुटुंबाच्या घरात गोमांस(beef) असल्याच्या संशयावरुन मोठ्या जमावाने या कुटुंबाला मारहाण केली. तसंच मारहाण करताना जय श्रीरामचे नारेही हा जमाव देत होता. त्यांनी या कुटुंबाच्या घरात असलेला फ्रिजही उचलून नेला. त्यामध्ये मांस ठेवलं होतं. ते गोमांस आहे असा आरोप या जमावाने केला आहे. तसंच या मुस्लीम कुटुंबाला जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या जमावासह एक पोलीसही दिसतो आहे.
नेमकी काय आणि कुठे घडली घटना?
अचानक जय श्रीराम चे नारे देत जमाव घरात आला आणि कुटुंबाला मारहाण केल्याची ही घटना आहे. जमावाच्या या कृतीमुळे मुस्लीम कुटुंब प्रचंड घाबरलं आहे. या कुटुंबाच्या घरात असलेल्या फ्रिजमध्ये गोमांस असल्याचा संशय जमावाला होता. त्यावरुन ही मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या घरात असलेला फ्रिजही उचलून नेण्यात आला. ओडिसातल्या खोरदा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. जमाव जय श्रीरामचे नारे देत आम्हाला मारहाण करत होता असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
हेही वाचा :
निवडणूक आयोगाला ८ मतदारसंघांतून अर्ज
टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहितचा मोठा खुलासा, म्हणाला…