कोल्हापूर शहरातील गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पोलिस(police) ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण, शस्त्राचा धाक दाखवणे यासह विविध गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पाेलिस ठाण्यात बाेलावून समज दिली. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांना केवळ समजच दिली नाही तर आपल्या स्टाईलनं डोस दिल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात हाेती.
कोल्हापूर शहर आणि परिसरातील मोक्का तसच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना राजारामपुरी पोलीस(police) ठाण्यात एकत्र आणलं. या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी खरपूस समाचार घेतला.
गुन्हेगारांची उठबस कुठे आहे. त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत. सध्या ते कोणत्या व्यवसायात आहेत. यासंबंधी पोलिस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं. या गुन्हेगारांसंदर्भात किरकोळ तक्रार जरी प्राप्त झाली तरी त्यांची गय केली जाणार नाही अशी सूचना वजा इशाराच टिकेंनी दिला.
यासोबतच एकमेकांना सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आव्हान देऊन टोळी युद्ध घडल्यास अशा रिल्स स्टारवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला.
हेही वाचा :
गौतम गंभीर यांनी महेंद्र सिंग धोनीच्या कर्णधार पदावर केले मोठे व्यक्तव्य
7 जुलैपर्यंत ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन…
मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या, पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा; ओबीसी बांधव खवळले