लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य, उपोषण अखेर मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी नेते(world hunger) लक्ष्मण हाके यांनी गेल्या 9 दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. दरम्यान हाके यांनी हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य केला असून, त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना हाके म्हणाले, “दहा दिवस झाले तरी आमच्या आंदोलनाकडे(world hunger) कोणी फिरकले नव्हते. त्यामुळे आम्हाला नेहमी डावलले जात असल्याची भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे.

कुणबींना मराठा समाजातील ‘सगे सोयरे’ म्हणून मान्यता देणारी महाराष्ट्र सरकारची मसुदा अधिसूचना रद्द करण्याची मागणी ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली होती. त्याचबरोबर जातीच्या दाखल्याची पॅन आणि आधार कार्डशी नोंदणी करावी, अशी त्यांची मागणी होती.

मराठीत ‘सगे सोयरे’ या शब्दाचा अर्थ जन्मजात आणि विवाहाद्वारे नातेसंबंध असा होतो. महाराष्ट्रात कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षमाचा लाभ मिळतो.

हाके यांना भेटण्यास गेलेल्या सरकारच्या शिष्टमंडळात आमदार गोपिचंद पडळकर यांचाही समावेश होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,”सगे सोयरे हा शब्द अस्तित्वात नसल्याची सरकारची ठाम भूमिका आहे.

सरकारच्या शिष्टमंडळात सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचाही समावेश होता. वडीगोद्री येथे बोलताना भुजबळ म्हणाले, “आम्ही कुणालाही धमक्या देत नाही आणि कुणालाही भीत नाही. पण निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही आमच्या ओबीसी बांधवांच्या घरावर हल्ले झाले. आम्ही मागणी करत आहोत की, आमच्या ताटातील आरक्षण काढून घेऊ नका. त्यांना काही द्यायचेय ते द्या.”

हेही वाचा :

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्मांतरण करणार का?

मोठी बातमी! छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी

काँग्रेसच्या मोर्चातून धैर्यशील मानेंचा ‘शक्तीपीठ’वरून शिंदे सरकारला घरचा आहेर!