लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी(teachers) सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून काल त्यांनी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. अशातच मुख्यमंत्री शिंदेच्या जळगावमधील बैठकांनंतर पैसे वाटप झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(teachers) यांची यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले,” असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच अंधारेंनी एक व्हिडिओ देखील ट्वीट केला असून कुठाय निवडणूक आयोग? असा सवाल उपस्थित केला आहे.
यावरुनच खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “सुषमा अंधारे यांनी त्याबाबतचा व्हिडीओ दिला. हा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पदवीधर शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. लोकशाहीची हत्या होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पाहत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सुषमा अंधारे यांना काही काम नाही. पोलिंग एजेंटला याद्या द्यायच्या असतात. त्या याद्यांबरोबर पैसे ही दिले जातात. यादी बरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे आणि सर्वांना ही माहितीच आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा :
ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर, कारने तिघांना चिरडले
आंघोळीच्या वादातून 2 जणांची हत्या झाली, नेमकं काय घडलं?
धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला…