मुख्यमंत्र्यांची घोषणा,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त स्मारक

 रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक(monument) उभारण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत केली. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवले. राज्य सरकार हाच विचार पुढे घेऊन जात असून समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, सर्वांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गतीने प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४ चे रविवारी नरिमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवना, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या सारनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.

हेही वाचा :

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-4174596453750186&output=html&h=280&slotname=7757942536&adk=592628073&adf=2822457859&pi=t.ma~as.7757942536&w=754&abgtt=6&fwrn=4&fwrnh=100&lmt=1719157529&rafmt=1&format=754×280&url=https%3A%2F%2Fsmartichi.com%2Fclean-sweep-of-south-africa-team-india-win-by-6-wickets%2F&fwr=0&fwrattr=true&rpe=1&resp_fmts=3&wgl=1&uach=WyJXaW5kb3dzIiwiMTAuMC4wIiwieDg2IiwiIiwiMTI2LjAuNjQ3OC4xMTQiLG51bGwsMCxudWxsLCI2NCIsW1siTm90L0EpQnJhbmQiLCI4LjAuMC4wIl0sWyJDaHJvbWl1bSIsIjEyNi4wLjY0NzguMTE0Il0sWyJHb29nbGUgQ2hyb21lIiwiMTI2LjAuNjQ3OC4xMTQiXV0sMF0.&dt=1719157529650&bpp=4&bdt=114&idt=4&shv=r20240618&mjsv=m202406180101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3Daaef33da5bac37d0-220554cd3ce50080%3AT%3D1698216877%3ART%3D1719157528%3AS%3DALNI_MZzTpWbUWePvFEBcX4tGNPqlv9BnQ&gpic=UID%3D00000c7333618019%3AT%3D1698216877%3ART%3D1719157528%3AS%3DALNI_MYwUeTpz4SNlyw2zlbe1emhOBaRbw&eo_id_str=ID%3D82914bccfdc5c54d%3AT%3D1708086879%3ART%3D1719157528%3AS%3DAA-AfjbptBd1PxYqnRPp0-fT9A5e&prev_fmts=0x0&nras=1&correlator=1044610218069&frm=20&pv=1&ga_vid=824913774.1698216876&ga_sid=1719157530&ga_hid=632967675&ga_fc=1&u_tz=330&u_his=17&u_h=1080&u_w=1920&u_ah=1040&u_aw=1920&u_cd=24&u_sd=1&dmc=8&adx=373&ady=2292&biw=1903&bih=919&scr_x=0&scr_y=0&eid=44759876%2C44759927%2C44759837%2C31084689%2C95334511%2C95334527%2C95334573%2C95334580%2C95335896%2C95331954%2C95335291%2C31078663%2C31078665%2C31078668%2C31078670&oid=2&pvsid=3725334484486486&tmod=1864244410&uas=0&nvt=1&ref=https%3A%2F%2Fsmartichi.com%2F&fc=1920&brdim=0%2C0%2C0%2C0%2C1920%2C0%2C1920%2C1040%2C1920%2C919&vis=1&rsz=%7C%7CeEbr%7C&abl=CS&pfx=0&cms=2&fu=128&bc=31&bz=1&td=1&tdf=2&psd=W251bGwsbnVsbCxudWxsLDNd&nt=1&ifi=4&uci=a!4&btvi=1&fsb=1&dtd=15

हेही वाचा :

 दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप, टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय

गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा चविष्ट चिली गार्लिक पराठा

महिलांना शिव्या देण्याचा संजय राऊतचा स्ट्राईक रेट!