माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल(mla example) एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल(mla example) करण्याची धमकी देऊन एका माजी आमदाराला ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी हे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ‘तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडियावर व्हायरल करायची नसेल, तर आम्हाला एक कोटी 25 हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या तथाकथित पत्रकाराने माजी आमदाराला ब्लॅकमेल करत होते.

संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, अहमदनगरमध्ये युट्युब चॅनेलचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून अनधिकृत न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने कुणी तक्रार देण्यास तयार होत नाही. याचाच फायदा घेत असे युट्युब चॅनेल्स चालवणाऱ्यांचे फावत असून प्रशासनाने सुमोटो अशा युट्युब चॅनेलच्या बोगस पत्रकारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

हेही वाचा :

मतांची पेरणी करणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

भाजपच्या महिला नेत्याला नग्न करून मारहाण? नव्या वादाला सुरुवात

“आता कल्ला तर होणारच, पण…” ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित