मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना मोठा फटका बसणार आहे, कारण ऑगस्टपासून बँकेच्या(credit)नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. हे नवीन नियम कार्डधारकांच्या व्यवहारांवर आणि शुल्कांवर परिणाम करू शकतात. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी या बदलांबद्दल माहिती घेऊन आपल्या खर्चाच्या नियोजनात बदल करण्याची गरज आहे.

एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या(credit) नव्या नियमांनुसार CRED, Cheq, MobiKwik, Freecharge अशा प्रकारच्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या व्यव्हारावर १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी प्रति व्यव्हाराची मर्यादा आहे. ग्राहक आता ३००० रुपयांचे व्यव्हार एकावेळी करु शकणार आहेत.

जर तुम्ही १५ हजारांपेक्षा कमी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. जर तुम्ही १५०००पेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला १ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. इंधनाच्या खरेदीवर तुम्हाला हे शुल्क द्यावे लागणार आहे.

जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला ५०,००० पेक्षा कमी व्यव्हारांवर शुल्क भरावे लागणार नाही. पंरतु जर तु्म्ही ५० हजारांपेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला १ टक्के शुल्क द्यावे लागेल. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विमा व्यव्हारावर शुल्क आकारले जाणार आहे.

कॉलेज किंवा शाळेच्या वेबसाइटद्वारे किंवा पीओएस मशीनद्वारे डायरेक्ट पेमेंट केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या अॅपवरुन पेमेंट करत असाल तरीदेखील तुम्हाला १ टक्के शुल्क भरावे लागणार आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय व्यव्हार किंवा क्रॉस करन्सी व्यव्हारांवर ३.५ टक्के मार्कअर शुल्क लागू केले जाईल. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ईएमआय भरत असाल तर तुमच्याकडून २९९ रुपयांचे शुल्क आकारले जाईल.ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वस्तू खरेदी केल्यावर हे शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे.

हेही वाचा :

मतांची पेरणी करणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

भाजपच्या महिला नेत्याला नग्न करून मारहाण? नव्या वादाला सुरुवात

माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी