महाराष्ट्रात दुधाचा दर सर्वात कमी आहे. तरीही राज्य सरकारने(govt) दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ नये याची सरकार चांगलीच काळजी घेत आहे. अमूलला कसा फायदा होईल यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारचं(govt) शेतकरी विरोधी धोरण कायम आहे. सरकार आयात करत असलेल्या दूध भुकटीला आमचा विरोध आहे. दुधाचे दर कमी जास्त करणं राज्य सरकारच्या हातात असतं. अमूल नुकसान करत आहे त्यावर बोलल जात नाही. हे सरकार गुजरात धार्जिणी आहे. मात्र ४० रुपये लिटर दूध मिळावं ही आमची मागणी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत हिटलरशाही नाही. प्रत्येक पक्षाला, पक्षातील सदस्यला मत मांडण्याचा अधिकार आहे. मविआत बसू तेव्हा एकत्र जनतेसमोर जाऊ ही भूमिका आहे मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी वीज मोफत दिली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार आल्यानंतरही त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी वीज बिल फ्री दिलं जाईल असं सांगितलं होतं. राज्याला आपल्या खांद्यावर भार घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. लाडली बहिण याचा जीआर काढला आहे, मात्र त्याचा बुर्खा आपण उद्यापासून फाडू. यासंदर्भात हक्कभंग देखील मुख्यमंत्र्यांवर टाकला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जीआर काढला आणि घोषित केलं. मात्र आमचं म्हणणं आहे दीड हजारांनी नाही चालणार, साडे आठ हजार रुपये मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे मत नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केलंय.
या योजनेत किती महिलांना लाभ मिळणार आहे आणि किती अटी आहेत? द्यायचे आहे तर प्रामाणिक पणे द्या. राज्यातल्या तिजोरीतले पैसे असे जात असतील तर आम्हाला आनंदच आहे. सरसकट बहीणींना फायदा झाला पाहिजे, ही आमची मागणी होती. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही खटाखट खटाखट पैसे टाकले असते. हल्लीचा राज्यातील बजेट म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात जनतेची दिशाभूल करणारा पहिला बजेट असेल. हे राज्यातल्या जनतेचं नव्हे तर थातुरमातूर बजेट आहे. शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांसाठी यांना काही करायची गरज नाही. असा घणाघातही नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.
हेही वाचा :
विराट, रोहितनंतर आता ‘या’ दिग्गज खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? पवारांनी थेटच सांगितलं
विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना दोन गटात गोळीबार अन् कोयत्याने राडा