मुंबई: आपल्या अतरंगी फॅशनमुळे आणि अंगप्रदर्शनामुळे सतत चर्चेत(be strong) असलेली अभिनेत्री उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर नवा व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसतेय आणि ती पूर्णपणे नशेत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पापाराझींनी शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये उर्फीची बहीण तिला हात पकडून चालण्यास मदत करतेय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकर्यांनी उर्फीला जोरदार ट्रोल केलं आहे.
उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया(be strong) दिल्या आहेत. काही जणांनी तिला नशेत असल्यानं धड चालता येत नसल्याबद्दल सुनावलं आहे, तर काहींनी हे सगळं ड्रामा असल्याचं म्हटलं आहे. एकाने कमेंट केली, “उर्फीला दारू जास्त झाली”, तर दुसऱ्याने म्हटलं, “उर्फीचा हा सगळा ड्रामा आहे, सुरुवातीची काही पावलं ती नीट चालत होती.”
गेल्या काही महिन्यांत उर्फीने तिच्या अतरंगी फॅशनमुळे लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या काही ड्रेसमधील कल्पकता नेटकऱ्यांना आवडली होती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा तिचं कौतुक केलं होतं. पण हा नशेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं तिच्या प्रतिमेवर काहीसा परिणाम झाला आहे.
उर्फी जावेद म्हटलं की डोळ्यांसमोर चित्रविचित्र कपड्यांमधील तरुणीच येते. उर्फीने घरातल्या विविध वस्तूंपासून कपडे डिझाइन केले आहेत. तिच्यावर अंगप्रदर्शन केल्यामुळे टीका झाली असली तरी तिच्या काही ड्रेस कौतुकास पात्र ठरले आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि जान्हवी कपूर यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे.
उर्फीने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिलं होतं, “काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असं ती म्हणाली होती.
हेही वाचा :
वरळी हिट अँड रन प्रकरण; ती भरधाव कार शिंदे गटातील बड्या नेत्याची
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, जी…” नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
खळबळजनक! अभ्यास केला नाही म्हणून शिक्षक ओरडले, विद्यार्थ्याने भर वर्गातच चाकूने भोसकलं