बॉलीवूडमधलं एक मोठं नाव म्हणजे करण जौहर. करण हा 2017 मध्ये सरोगसीच्या(kids) माध्यमातून बाप झाला. पण तो सिंगर फादर आहे. त्यामुळे करणची आईच त्याच्या जुळ्या मुलांसाठी आईची भूमिका निभावते. अनेकदा करण त्याच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण त्याच्या मुलांना कायम त्यांची आई कोण आहे, असा प्रश्न पडतो. याविषयी करणने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
करणने फेय डिसूझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं. करणची(kids) मुलं जशी मोठी होत आहेत, तसे ते त्यांच्या आईविषयी करणला वारंवार सवाल करत असतात. त्याच्या मुलांनी त्याला त्यांचा जन्म कसा झाला असा प्रश्न देखील विचारला होता. याविषयी करणने मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
करणने या मुलाखतीमध्ये त्याच्या मुलांना तो कसा सांभाळतो याविषयी भाष्य केलं आहे. करणने म्हटलं की, आमची एक मॉर्डन फॅमिली आहे आणि परिस्थिती देखील खूप असमान्य आहे. आम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे? मुलांच्या या प्रश्नाशी सध्या मी डील करत आहे. त्यासाठी स्कूल काऊन्सिलरकडेही जातोय, जेणेकरुन अशा परिस्थिती कसं वागावं या गोष्टीचा अंदाज येईल. कारण पालक होणं सोप्पं नसतं.
करण जौहरने पुढे म्हटलं की, मी माझ्या मुलामुळे मी सतत काळजीत असतो. करणने म्हटलं की, जेव्हा मी माझ्या मुलाला साखर खाताना पाहतो आणि त्याचं वजन वाढलेलं पाहतो, तेव्हा मला खूप काळजी लागून राहिलेली असते. पण मला त्याला काही बोलावसं पण वाटत नाही, कारण हेच त्याचं वय आहे, ज्यामध्ये तो त्याला हवं ते करु शकतो.
हेही वाचा :
रोहित नाही तर… श्रीलंका दौऱ्यावर ‘हा’ पठ्ठ्या असणार टीम इंडियाचा कर्णधार?
‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? सरकारची डोकेदुखी वाढली
विधानसभेपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला ‘पॉवर’! निवडणूक आयोगाचा ‘तो’ निर्णय ठरणार गेमचेंजर