भारताने झिम्बाब्वेविरोधात तिसऱ्या टी20 (t20) सामन्यात निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून कर्णधार शुभमन गिल याने शानदार अर्धशतक ठोकले तर ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले. यशस्वी जैस्वालनेही निर्णायक 36 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेला विजयासाठी 183 धावांचे आव्हान मिळाले आहे. पाच सामन्यांची टी20 (t20) मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
टीम इंडियासाठी कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. शुभमन गिल याने 49 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला, त्यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी फिल्डिंग अतिशय खराब केली, ज्यामुळे टीम इंडियाला 20-25 धावा अतिरिक्त काढता आल्या. यजमान झिम्बाब्वे संघाकडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 67 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला शानदार सुरुवात दिली. जैस्वाल या मालिकेतील पहिला सामना खेळत होता, त्याने 27 चेंडूत 36 धावा केल्या. दुसऱ्या सामन्याचा शतकवीर अभिषेक शर्मा आज काही विशेष करू शकला नाही, त्याने 9 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 28 चेंडूत 49 धावा केल्या. गायकवाडचे आपल्या T20 कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक हुकले पण संघाला 182 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
हेही वाचा :
रिल्स बनवण्याच्या नादात दोन विद्यार्थी ठार
नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम
शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका