कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक, तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कोंडलं

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात संतप्त(veterinary) झालेल्या ग्रामस्थांनी तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडल्याची घटना घडली आहे. पुरस्थितीत काम करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ संतापले असून, त्यांनी जनावरांचा चारा आणि औषध पुरवण्यासाठी तहसीलदारांनी सूचना दिल्यानंतर देखील अधिकारी काम करण्यास नकार देत असल्याने हा प्रकार घडला.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथल्या पंचगंगा नदीला (veterinary)आलेल्या पुरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना सेवा मिळावी आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी अन्याय निवारण कृती समितीने सोमवारी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांच्या माफीनंतर पूरग्रस्त शांत झाले.

गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेरून कडी लावून ठेवत तणावाचे वातावरण निर्माण केले होते. मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि मोठे नुकसान झाले. जनावरांचा चारा वाहून गेला आणि शेती पाण्याखाली गेल्याने शेतपिकाचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा :

‘कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं’

कांबळीला उभंही राहता येईना… धक्कादायक Video नंतर सचिन मित्रासाठी येणार धावून?

धर्मामुळे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! 8 महिन्यात अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न? VIDEO