कोल्हापूरच्या एका लहान मुलाने हलगीच्या ठेक्यावर केलेल्या भन्नाट (deal)डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या लहानग्याच्या जबरा डान्सने सर्वांनाच आकर्षित केले आहे, त्याचे तोंडावरील हावभाव आणि ठेक्यावरचे हातवारे प्रेक्षकांना थक्क करत आहेत.

कोल्हापूरकरांना जल्लोष कसा साजरा(deal) करायचा हे चांगलं माहीत आहे, आणि हा लहान मुलगा त्याचा उत्तम उदाहरण ठरला आहे. आपल्या मित्रांसोबत हलगीच्या तालावर थिरकत, त्याने मोठ्यांनाही लाजवेल असा तडाखेबाज परफॉर्मन्स दिला आहे. हा व्हिडिओ पाहून इतरही लोक आनंदात नाचायला प्रेरित होत आहेत.
धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण शोधत असताना, या मुलाच्या डान्सने सर्वांनाच हसवले आणि आनंद दिला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या तालावर थिरकणं हे सर्वांच्याच मनाचा ठाव घेतं. पण हलगीच्या ठेक्यावर या लहान मुलाने दिलेली परफॉर्मन्स सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा :
रेल्वे विभागात 3317 जागांसाठी मेगाभरती…
‘माझ्यावर चढू नकोस’, फोटोग्राफर्सवर भडकली तापसी पन्नू
“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला”