‘बिग बॉस मराठी’(big boss marathi)च्या घरात निक्की तांबेच्या वागण्यामुळे खळबळ उडाली आहे. नॉमिनेट झाल्याच्या रागात निक्कीने कामं करण्यास नकार दिला होता,
ज्यामुळे घरातलं वातावरण तंग झालं. यामुळे वीकेंडच्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये रितेशने निक्कीची चांगलीच शाळा घेतली. तिची कॅप्टन्सी कायमची काढून घेतली गेली आणि आठवडाभर भांडी घासण्याची शिक्षा सुनावली.
रितेशने निक्कीला इशारा दिला की, “शिक्षेचं पालन केलं नाहीतर आणखी कठोर परिणाम भोगावे लागतील.” घरातील सदस्यांनी निक्कीच्या दादागिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली, आणि या वागणुकीचा फटका तिला बसल्याचे दिसले.
हेही वाचा:
पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये नवदीप सिंहचे सुवर्णसिंकण! नीरज चोप्राला जमलं नाही, ते नवदीपने केलं;
गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!
कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब