काही दिवसांपूर्वीच भाजपला(politics) पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अशात भाजपला पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपचा एक बडा नेता शरद पवारांच्या गळाला असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
माजी आमदार(politics) आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे विधानसभा पूर्वीच भाजपला हा मोठा झटका बसू शकतो.
वडगाव शेरीमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेला ही जागा त्यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपला ही जागा मिळेल की नाही, याबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही.
वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. यामुळेच बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. इतकंच नाही तर, ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं जाहीर करत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
यापूर्वी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपला धक्का दिला. आता पुण्यात भाजपला दूसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध गणेश मंडळांना भेटी देत विधानसभेसाठी आपण ‘तुतारी’ हाती घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी तुतारीला मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. महायुतीला म्हणावी तशी छाप लोकसभेत सोडता आली नाही. या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटात अनेकांनी घरवापसी केली आहे. तर, अजूनही इनकमिंग सुरूच आहे. महायुतीमध्ये उमेदवारीमुळे अनेक नेत्यांची नाराजी समोर येत आहे. याचा फटका महयुतीला बसत आहे.
हेही वाचा:
‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत झाला ‘हा’ मोठा बदल; आता…
पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी, ८ तासांच्या संघर्षानंतर बचावकार्यात यश
पुण्यातील मानाचे 5 गणपती; दर्शनासाठी राज्यभरातून भक्तांची मोठी गर्दी