वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीमुळे अनेक जिओ(jio) युजर्सनी त्यांचे सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट केलं. युजर्सनी जिओवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांनी जिओ युजर्ससाठी एक नवीन डेटा प्लॅन लाँच केला आहे. याची किंमत केवळ 11 रुपये असून युजर्सना या प्लॅनमध्ये हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे.
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ(jio) आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन प्लॅन ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार विविध फायद्यांसह प्लॅन उपलब्ध आहेत. आता कंपनीने यूजर्ससाठी एक नवीन डेटा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना मर्यादित काळासाठी हाय स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. या नवीन प्लॅनची किंमत केवळ 11 रुपये आहे.
जिओचा हा प्रीपेड प्लॅन 11 रुपयांचा आहे, जो अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 तासासाठी हाय स्पीड इंटरनेट अनलिमिटेड डेटा दिला जातो. ज्या ग्राहकांना कमी वेळेत जास्त डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा जिओचा हा नवीन डेटा प्लॅन उत्तम आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना हाय स्पीडवर 10 GB डेटा मिळतो. 10 GB डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होतो.
जिओचा नवा डेटा प्लॅन 11 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 तासाची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनसाठी, बेस प्लॅन आधीपासून जिओ युजर्सच्या नंबरवर सक्रिय असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 10 GB डेटा मिळतो. पण यूजर्सला हा डेटा एका तासात वापरावा लागेल.
हेही वाचा :
नोव्हेंबरमध्ये वैष्णोदेवी दर्शनाचा प्लॅन करताय? भारतीय रेल्वे देतेय संधी
सासरा सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करायचा बळजबरी, जाणून घ्या हायकोर्टाने काय म्हटलं?
मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..