कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दिड दोन वर्षांपूर्वी राजकारण्यांकडून(politics) केले जाणारे गौप्यस्फोट हे ऐकायला आणि वाचायला सर्वसामान्य माणसाला मजा यायची. त्यानंतर सुरू झालेल्या गौप्यस्फोट मालिकेने त्यातली मजा आणि गांभीर्य संपले. पण तरीही मालिका काही संपत नाही. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राजकारणातील”सीक्रेट” ओपन व्हायला प्रारंभ झाला आहे. पण आता घटकाभरची करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. शरद पवार, छगन भुजबळ, अजित दादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरण्यासाठी एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत.
बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेनेत(politics) पहिले बंड छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाले असा कालपर्यंत सामान्य माणसाचा समज होता, पण तो गैरसमज दस्तुरखुद भुजबळ यांनीच मंगळवारी दूर केला. बाळासाहेबांची शिवसेना ही शरद पवार यांनीच फोडली. कारण मी एकटा असे धाडस तेव्हा करू शकत नव्हतो.असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
भुजबळ यांच्या येवला मतदार संघात मंगळवारी शरद पवारांची प्रचार सभा झाली. या सभेत त्यांनी भुजबळ यांच्यावर चौफेर टीका केली. माणसाने हसवावे किती? याला सुद्धा काही मर्यादा असतात. पण भुजबळ यांनी ही मर्यादा सोडली. फसवणाऱ्या, खोटे बोलणाऱ्या भुजबळांना मतदारांनी पराभूत करावे असे आवाहन केल्यानंतर अस्वस्थ बनलेल्या छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार करताना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनीच फोडली असा गौप्यस्फोट केला आहे.
अजित दादा पवार यांनी त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या शपथविधी बद्दल त्यांच्याकडून राहून गेलेला गौप्यस्फोट करण्यात आला आहे. नवी दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबद्दलची बैठक झाली. या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे दोघेही उपस्थित होते. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसारच माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. पण अचानक शरद पवार यांनी माझे त्याला समर्थन नव्हते असा यु टर्न घेतला असा गौप्यस्फोट अजितदादा पवार यांनी केला आहे.
पहाटेच्या तथाकथित शपथविधी बद्दल गेल्या पाच वर्षात असे अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या गौप्यस्फोटात प्रथमच उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव आले आहे. आणि आता तर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे गौतम अदानी यांचाच हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडून गौतम अदानी यांना रडार वर घेतले गेलेले आहे. त्याचे कारण संजय राऊत यांनी मंगळवारी स्पष्ट केलेले दिसते.
शरद पवार यांच्या राजकारणावर(politics) कोणताही नेता सहजासहजी विश्वास ठेवत नाही. ते बोलतात एक आणि करतात नेमके उलटे असे त्यांच्या राजकारणाबद्दल सर्रास बोलले जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी अथक परिश्रमातून उभी केलेली शिवसेना ही संघटना त्यांनी छगन भुजबळ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फोडली. हे आता त्यांचेच एकेकाळचे अति जवळचे सहकारी छगन भुजबळ सांगू लागले आहेत. याचा अर्थ शरद पवार यांनी जे पेरले तेच दिनांक दोन जुलै 2023 रोजी उगवले असे म्हणावे लागेल. कारण याच दिवशी अजित दादा पवार यांनी वेगळा निर्णय घेतला.
2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाचा स्थान मिळाले होते. तेव्हा त्यांनी माझे राजकीय पुनर्वसन फक्त आणि फक्त शरद पवार यांनीच केले अशी प्रतिक्रिया दिली होती. आता हेच छगन भुजबळ भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, यांच्याकडे ठाम अशी विचारधारा आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सुद्धा काही प्रमाणात विचारधारा आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणतीही विचारधारा नाही असा घरचा आहेर दिला आहे. मग कोणतीही विचारधारा नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते इतकी वर्षे रमले कसे? याचा अर्थ त्यांचेही राजकारण कोणत्याही विचारधारेवर आधारलेले नाही असे म्हणावे लागेल.
हेही वाचा :
नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडक
मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!
‘ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या…’; प्रतिभा पवारांनी शरद पवारांना स्पष्टच सांगितलं