आज सोमवारी महादेव कुणावर करणार सुखाचा वर्षाव?

दैनिक राशिफळ(astrology) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 16 डिसेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी(astrology) कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे.

आज 12 पैकी 3 राशीसाठी शुभ दिवस असणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी वरदानासारखा असणार आहे. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील. आज या तीन राशीवर महादेव यांची कृपादृष्टी असणार आहे.

मिथुन रास : तरूणांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. तुमचे प्रेमाचे संबंध अजून बहरतील. तुम्ही आज विवाहासाठी निर्णय घ्याल. संबंध जुळण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील आजचा दिवस खास जाईल. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल.

कर्क रास : बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचा योग्य मिलाफ झाल्यामुळे आत्मविश्वास बळावेल.आज तुमच्या कर्तृत्वाचे परीक्षण होईल. तुमचे कौतुक होईल. तुम्हाला आज कोणत्याही क्षेत्रात प्रमोशन मिळेल. यामुळे पूर्ण दिवस आनंदी राहाल.

सिंह रास : व्यवसायात एखादा दृढनिश्चय कराल, त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. आज तुम्ही गुंतवलेले पैसे डबल होतील. तुमच्या योजना सत्यात उतरतील. तुम्ही सकारात्मक राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हान देणारा असेल, मात्र त्यातून तुम्ही यशस्वीपणे बाहेर पडाल.

हेही वाचा :

कलाविश्वात शोककळा! जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

चाणक्य नीतीचा सोन्याचा नियम: श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली, फक्त या गोष्टींवर करा खर्च!

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांबाबत मोठा निर्णय