भारतीय स्टार क्रिकेटपटू(Cricketer) शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे कमालीचा चर्चेत आहे. शिखर धवन याने २०२३ मध्ये पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेतलाय. ते दोघेही २०२० पासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
त्यानंतर त्यांनी तीन वर्षांनी म्हणजेच २०२३ मध्ये कायदेशीररित्या एकमेकांसोबत घटस्फोट घेतला. आयेशा परदेशात तर शिखर भारतात राहतो. आयेशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शिखर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सध्या त्यांचे सोशल मीडियावर काही फोटोज् व्हायरल होत आहे.
काही तासांपासून सोशल मीडियावर हुमा आणि शिखरचे काही रोमँटिक अंदाजातील फोटो तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. खरंतर हे व्हायरल होणारे फोटो फेक असून एआयच्या मदतीने बनवून ते फोटो व्हायरल करण्यात आलेले आहेत.
आजवर कधीही न एकत्रित फोटो काढलेल्या शिखर(Cricketer) आणि हुमा एकमेकांना डेट करत नाहीयेत, तसेच त्यांचं लग्नही झालेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्नातले फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही सोशल मीडिया अकाऊंट्सने या दोघांचे लग्न झाले आहे, असं म्हणत लोकांची दिशाभूल केली.
लग्नाचे आणि सध्या व्हायरल होणारे रोमँटिक फोटो फेक आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. दोघांनीही आजवर केव्हाच एकत्र फोटो काढलेले नाहीत. खरंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘डबल एक्स एल’ चित्रपटात हुमा कुरेशी आणि शिखर धवनने एकत्र काम केलं होतं, त्यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. चित्रपटाच्या माध्यमातून शिखर धवनने कॅमिओ केलं होतं. शिखरला अभिनयात रस असून त्याच्या इन्स्टा रिल्स कायमच चर्चेत असतात. अनेक ट्रेडिंग गाण्यांवर तो रिल्स बनवत असतो.
गेल्या मागील काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींचे एआय जनरेटेड फेक फोटो व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचेही असेच एआय जनरेटेड फोटो व्हायरल झाले होते. सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घटस्फोट झाल्यावर क्रिकेटपटू मोहम्मद शमीशी लग्न केल्याच्या अफवा या फोटोंमुळे पसरल्या.
हेही वाचा :
वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल
मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; खत आणि पीकविमा योजनांवर मिळणार जास्त सबसिडी
चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर… 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?