गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या दिल्लीच्या विधानसभा(Assembly) निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मतदान आणि निकालाची तारीख जाहीर केली. दिल्ली विधानसभेसाठी ५ फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
नव्या वर्षात दिल्लीत विधानसभेच्या(Assembly) निवडणुका होत आहेत. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेलं पहायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचं दर्शन दिल्लीत होतं. त्यामुळे दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याबाबतची घोषणा करतील. १८ फेब्रुवारीला ते निवृत्त होणार आहेत.
दिल्लीत १.५ कोटी हून अधिक मतदार आहेत. २.०८ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी होणार आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले आहेत. नवी दिल्ली ही VIP सीट आहे.
भाजप आणि काँग्रेसनेही आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपने सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. मात्र यावेळी आपला भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही असल्यांच वक्तव्य केलं. त्यामुळे दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे.
विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविषयी भाजपचे उमेदवार रमेश दिबुडी यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यामुळेही दिल्लीचं राजकारण तापलं आहे. त्याला आतिशी यांनीही जशाच जसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
WhatsApp चॅट डिलीट झाला? या टिप्सने करा सोप्या पद्धतीने रिकव्हर!
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नक्की चाललंय तरी काय; NIT भ्रष्ट्राचाराविरोधात काँग्रेस आक्रमक
सना खानच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला, ‘राजकुमार’ घरी येताच खास पद्धतीने दिली खुशखबर!