कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं सत्र वाढत असून सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पूर्वेतील अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता एका क्षुल्लक कारणामुळे(brother) सख्य़ा भावाची हत्या केल्याची दुर्देवी घटना कल्याणमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री कल्याण पश्चिम येथील रोहिदास वाडा परिसरात राहणारा नईम खान खिशामधले पाचशे रुपये गायब झाले.
घरी असताना आपल्या शर्टच्या खिशातून पैसे कोणी काढले असं त्याला वाटलं. खिशातले पैसे भावाने काढले असावेत असा त्याला संशय आला.पाचशे रुपये गायब झाले, म्हणून दोन (brother)सख्ख्या भावांमध्ये वाद झाला.
या वादातून रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे. याप्रकरणी हत्या करणारा आरोपी भाऊ सलीम खानला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.नवीन खान याचे पैसे गायब झाल्याने त्यांनी आपल्या भाऊ सलीम खान याला विचारले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या भांडणात त्यांची आई मध्ये पडली.
मी तुला पाचशे रुपये देते असं तिने सांगितले. मात्र भावासोबत वाद घालू नको. अशी विनंती त्यांच्या आईने केली. मात्र दोन भावांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की, मोठा भाऊ सलीम खान यांनी धारदार शस्त्राने लहान भाऊ नवीन वर वार केले या हल्ल्यात नईम हा जखमी झाला त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारात दरम्यान त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. घटनेनंतर सलीम हा फरार झाला होता. रात्री उशिरा त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. फक्त पाचशे रुपयासाठी सख्ख्या भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेले काही दिवस कल्याण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराचे डीसीपी अतुल झेंडे यांनी परिसराती गुन्ह्यांबाबत माहिती दिली होती.
डीसीपी अतुल झेंडे म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी, निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार, प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली आहे, लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे.
त्यातील 3 बारचे लायसन्स रद्द झालेत, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे,मद्य प्राशन करणे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे, जे आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केलीय, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे. असं पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा :
IT कंपनीतील तरुणीची हत्या: आर्थिक वादामुळे कोयत्याने घातक हत्या!
सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण?
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार, 28 दिवसांचा फर्लो मंजूर