काँग्रेसला राम राम ठोकत पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (politics) इनकमिंग सुरु झालेलं आहे, असं असताना मंगळवारी 7 जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. पोटे दाम्पत्याचा शिंदेसेनेत प्रवेश हा बाळासाहेब थोरात यांना धक्का मानला जातोय.

येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात(politics) मोठा स्फोट होणार आहे. आणखी दिग्गज मंडळींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे. यावेळी श्रीगोंदा तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे उपस्थित होते.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवून जनतेला सेवा देण्याचे कार्य केले. कल्याणकारी राज्याला पसंती दर्शवून जनतेने पुन्हा महायुती सरकारला निवडून दिले. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रभावित होवून शहरासह जिल्ह्यात अनेक राजकीय मंडळी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. लवकरच अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केला.

अनिल शिंदे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे भगवे वादळ घोंगावणार आहे. विकासात्मक अजेंडा आणि जनतेची सेवेतून शिवसेनेला जनमत मिळत आहे. शिवसेनेच्या विकासात्मक कामांना प्रभावीत होवून राजकीय नेते आणि पदाधिकारी शिवसेनेकडे आकर्षिले जात आहेत. सर्वांना बरोबर घेऊन शक्ती वाढविण्याचे काम जिल्ह्यात केले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जनतेमधून निवडून आलेले काँग्रेसचे मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे या दाम्पत्याने सलग दहा वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय परिस्थिती बदलणार आहे. शिवसेनेच्या विकासात्मक कार्याने प्रभावीत होवून जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया मनोहर पोटे यांनी दिली.

हेही वाचा :

सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण?

धर्माच्या भिंती तोडून केला मुस्लीम क्रिकेटरशी विवाह, मराठमोळ्या सागरिका-झहीरची आंतरधर्मीय फिल्मी लव्ह स्टोरी

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: 500 रुपयांसाठी वाद, सख्ख्या भावाने केली भावाची हत्या