लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी गूड न्यूज; शस्त्रक्रियेविना होणार उपचार

लिव्हर कॅन्सर(liver cancer) हा एक गंभीर आजार असून या आजाराची उपचारपद्धती तितकीच कठीण मानली जाते. या आजाराच्या रुग्णांसाठी लिव्हर कॅन्सरवरील उपचार हा चिंतेचा विषय होता. मात्र, नुकत्याच एका झालेल्या संशोधनातून या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी एक नवा आशेचा किरण दिसला आहे.

इम्यूनोथेरेपी हे औषध लिव्हर कॅन्सरच्या(liver cancer) रुग्णांसाठी वरदान ठरु शकते, असे या संशोधनात सिद्ध झाले आहे. शस्त्रक्रियेविना या गंभीर आजारावर उपचार केले जाऊ शकतात निवारण. मेडिलत जर्नल लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, हे औषध ट्यूमरची वाढ कमी करते जेणेकरुन ट्यूमरला आळा घालण्यास मदत होऊ शकते.

ज्या लिव्हर कॅन्सर रुग्णांचे उपचार शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरेपीद्वारे केले जाऊ शकत नाही, त्या रुग्णांसाठी हे औषध जीवनदान देणारे ठरु शकते, असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. इम्यूनोथेरेपी हे औषध कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून थांबवते, तसेच ट्यूमरची वाढसुद्धा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. कॅन्सरच्या पेशींशी लढण्यासाठी हे औषध शरिरातील प्रतिराकरशक्ती वाढवते.

इम्यूनोथेरेपी औषध शरीराच्या इम्यून सिस्टमला मजबूत करते आणि कॅन्सरच्या ट्यूमरला केंद्रित करते. जे प्रोटीन कॅन्सरच्या पेशींना शरीराच्या इम्यून सिस्टमपासून वाचण्यासाठी मदत करतात, तेच प्रोटीन रोखण्यासाठी इम्यूनोथेरेपी कारणीभूत ठरते. याचा परिणाम कॅन्सर पेशींच्या वाढीवर होतो आणि ट्यूमरला आळा घालण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, इम्यूनोथेरेपी औषध हे लिव्हर कॅन्सरच्या उपचारपद्धतीत एक चांगला बदल घडवून आणून शकते. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे शक्य नाही किंवा ज्यांच्यासाठी शस्त्रक्रिया धोकादायक ठरु शकते त्या रुग्णांना या औषधाचा खूप फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त या औषधाच्या दीर्घकालीन प्रभावासाठी आणि हे औषध वापरात आणण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यासाची गरज आहे.

लिव्हर कॅन्सर या गंभीर आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आजार जगभरात रुग्णांच्या मृत्यूचे कारण ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी या आजारामुळे लाखो लोकांचा मृत्यु ओढवला आहे. भारतात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच, लिवर कँसरच्या उपचारपद्धतीतील या संशोधन डॉक्टर आणि रुग्णांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा :

आम्हाला पुन्हा पक्षात घ्या ! निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध

सोनू सूदच्या ॲक्शन लूकने चाहते झाले चकित, साऊथ सिनेमांनाही ‘फतेह’ने दिली टक्कर!

नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा; असे झाले तर, थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम