महाविकास आघाडीला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मविआमधील पक्षात खटके उडू लागल्याचे चित्र दिसले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती. या प्रश्नावर आता शरद पवार (Sharad Pawar)यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली टीका, इंडिया-मविआ आघाडीची सद्यस्थिती आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा याबाबत सविस्तर प्रश्न विचारण्यात आलं होते. या प्रश्नांवर शरद पवार(Sharad Pawar) यांनी उत्तरे दिली आहेत.
इंडिया आघाडीबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. दिल्ली विधानसभेला आप आणि काँग्रेस विरोधात लढत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीसाठी जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत चर्चा झाली होती.
पण राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका एकत्र लढण्याबाबतची चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्र याची नोंद घेत आहेत, त्यावरून राष्ट्रीय पातळीवरील भूमिकांमध्ये एकत्र राहण्याची भूमिका घेतली पाहीजे, असं वाटत असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे का? याबाबत आपले व्यक्तिगत मत काय? असाही एक प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, यात कसले व्यक्तिगत आले? आमच्या एकाही खासदाराचे वेगळे मत नाही. माध्यमांनी असा जावई शोध कुठून लावला, हे कळायला मार्ग नाही.
दरम्यान शिर्डीतील भाजपाच्या मेळाव्यात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते.
आपल्या शेजारचे राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावे घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचे वैशिष्ट्य होतं, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते, असं सांगून शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.
हेही वाचा :
साईंच्या शिर्डीतला संकल्प आणि जन आक्रोशाचा विकल्प
स्टेट बँकेची हर घर लखपती योजना बनवेल करोडपती, 593 रुपयांपासून गुंतवणुकीची संधी!
फायर है अपुन! नितीश रेड्डीने गुडघ्यांवर तिरुपतीच्या पायऱ्या चढून जिंकली चाहत्यांची मने, VIDEO Viral