हिंदू धर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी असते. त्यानुसार, पौष पक्षातील चतुर्थी तिथी 17 जानेवारीला आहे. ही संकष्ट चतुर्थी लाडक्या (Ganesha god)गणरायाला समर्पित आहे.
हिंदू धर्मात कोणतंही शुभ काम करण्याआधी(Ganesha god) गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं.
शुक्ल पक्षातील तिथी ही विनायकी चतुर्थी असते तर कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी चतुर्थी तिथीचं व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सुख-सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यानुसार, आजच्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता, पूजेची पद्धत कशी असणार? या संदर्भात अधिक जाणून घेऊयात.
पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही गणपतीला समर्पित आहे. ही संकष्ट चतुर्थी 17 जानेवारीला म्हणजेच उद्या असणार आहे. संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त पहाटे 4 वाजून 06 मिनिटांनी तिथी सुरु होईल तर 18 जानेवारीला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी संपेल.
संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 6 वाजून 21 मिनिटांपर्यंत असेल. तर सकाळी 8 वाजून 34 मिनिटांपासून ते 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त राहिल. चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री 9 वाजून 9 मिनिटांची असेल.
संकष्ट चतुर्थी पूजा विधी
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा.
त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा.
विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा.
त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा.
तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा.
देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे.
देवाची मनोभावे आरती करा.
पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
AI संदर्भात मार्क झुकरबर्ग यांचं मोठं विधान; डेव्हलपर्सच्या नोकऱ्या येणार धोक्यात?
आता पार्किंग नाही तर कार नाही ! महाराष्ट्रात लवकरच लागू होणार ‘हा’ नियम?
मोदी सरकारची मोठी घोषणा! 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी, सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लाग