हिंदू धर्मात(Hindu religion) सूर्यपुत्र शनिदेव यांना कर्माचे फळ देणारी देवता मानले जाते. न्यायाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव, व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार,(Hindu religion)शनि ग्रह कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. २०२५ मध्ये शनि ग्रह आपली राशी बदलणार असल्याने, हे वर्ष काही राशींसाठी खूप लाभदायी ठरेल, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, २९ मार्च २०२५ रोजी शनि स्वतःच्या कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा काही राशींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक प्रभाव पडेल.
‘या’ ३ राशींवर सुरू होणार शनीची साडेसाती
मेष: मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल.
मीन: मीन राशीवर साडेसातीचा दुसरा चरण सुरू होईल.
कुंभ: कुंभ राशीवर साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा चरण सुरू होईल. (Shani Transit 2025)
‘या’ राशीला मिळणार दिलासा-
मकर: मकर राशीची साडेसाती संपुष्टात येईल.
या व्यतिरिक्त, इतर काही राशींवर शनीचा ढैय्याचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिक माहिती लवकरच ज्योतिषांकडून अपेक्षित आहे.
हेही वाचा :
“चुकून शिवसेना ठाकरेंची म्हटल्यावर गोंधळ; भाजप नेत्याची माफी, चंद्रकांत पाटीलांनी मध्यस्थी केली!”
NPCL ने सुरु केली भरती; ‘या’ पत्त्यावर पाठवण्यात यावा अर्जाचा फॉर्म
कोल्हापूर : संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध!