साऊथ सुपरस्टार थलापति विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी(movie) सज्ज झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात थलपति विजयसोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेता बॉबी देओल देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘जना नयागन’ असे ठेवण्यात आले आहे.
थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या(movie) पहिल्या पोस्टरसोबत रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. सध्या थलपति विजयचे चाहते त्याच्या शेवटच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिनेता थलपति विजयने त्याच्या X वर रोमांचक घोषणा शेअर केली. तत्पूर्वी, चित्रपटाच्या अधिकृत प्रॉडक्शन हाऊस KVN प्रॉडक्शनने सोशल मीडियावर घोषणा केली होती की प्रजासत्ताक दिनी थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे शीर्षक प्रदर्शित केले जाईल. ‘जना नयागन’ हा या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. त्याची झलक पाहण्यासाठी चाहते देखील खूप आतुरतेने वाट पाहत होते.
‘जना नयागन’ चित्रपटाच्या(movie) पोस्टरमध्ये थलपति विजय त्याच्या अनेक फॉलोअर्ससोबत सेल्फी घेताना दिसत आहे. फोटोमध्ये थलपति विजय डेनिम शर्ट, डेनिम पँट आणि काळ्या गॉगल आणि थलपति विजयच्या स्वॅगमध्ये दिसत आहे.
‘जना नयागन’ चित्रपटाच्या कथेत थलपति विजयला ‘लोकशाहीचा मशाल वाहक’ म्हणून चित्रित केले आहे. जे त्याच्या तमिळ वेत्री कळघम पक्षाच्या लाँचसह त्याच्या अलीकडील राजकीय प्रयत्नांना प्रतिबिंबित करते. या चित्रपटात पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी आणि प्रकाश राज हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
#JanaNayagan pic.twitter.com/cs51UDEi1Q
— Vijay (@actorvijay) January 26, 2025
थलपति विजयचा ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम 2024’ चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे बजेट 380 ते 400 कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 440 ते 456 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले होते. तर युवन शंकर राजा या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते.
हेही वाचा :
भव्य दिव्य “छावा” चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात…..!
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; तिसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी…
माहेरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला आला राग; पाचव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन