नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात

नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक आहे. दैनंदिन आहारात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. नाचणीच्या पिठाचा वापर करून भाकरी, नाचणी सत्व, नाचणीचे आप्पे, नाचणीचे लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला नाचणीच्या(oats) स्मूदीचे सेवन करतात.

नाचणीसह(oats) दैनंदिन आहारात ओट्सचे सुद्धा सेवन केले जाते. ओट्स खाल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात ओट्स नाचणीचा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.

साहित्य:

  • ओट्स
  • नाचणीचे पीठ
  • बेकिंग सोडा
  • मीठ
  • दही
  • उडीद डाळ
  • लाल सुक्या मिरच्या
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • साखर

कृती:

  • ओट्स नाचणीचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणी, ओट्स आणि उडीद डाळीचे पीठ एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात दही आणि मीठ घालून मिक्स करा. तयार करून घेतलेले बॅटर व्यवस्थित मिक्स करून ५ ते ६ तासांसाठी फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवा.
  • पीठ आंबल्यानंतर त्यात जिरेपावडर, लाल तिखट मसाला, आलं हिरव्या मिरचीची पेस्ट, बेकिंग सोडा, तेल घालून मिक्स करून घ्या.
    मोठ्या ताटाला किंवा डब्याला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात तयार करून घेतलेले मिश्रण ओतून घ्या.
  • कुकरची शिट्टी काढून 15 ते 20 मिनिटांसाठी ढोकळा व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवा. ढोकळा शिजल्यानंतर त्यात बारीक काठी चेक करून घ्या.
  • फोडणी तयार करण्यासाठी फोडणीच्या वाटीमध्ये मोहरी, पांढरे तीळ, हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, कढीपत्त्याची पाने, साखर घालून खमंग फोडणी तयार करा.
  • तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर ओतून तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणी ओट्सचा खमंग ढोकळा.

हेही वाचा :

Vi आणि Jio चे खास प्लॅन; मोफत मिळणार Jio Hotstar चं सबस्क्रिप्शन

अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाबद्दल सर्वात मोठी अपडेट, पत्नी सुनिता आहुजा म्हणाली…

भाजप आमदाराच्या मुलाचा आयुष्य संपण्याचा प्रयत्न, प्रकृती गंभीर