आजकाल अस्वस्थ जीवनशैली, झोपेचा अभाव आणि(lifestyle)चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्वचेला वेळेपूर्वी सुरकुत्या, कोरडेपणा आणि थकवा जाणवतो. बाहेरील रसायनयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात. कोरफड ही एक अशी नैसर्गिक देणगी आहे, जी त्वचेसाठी वरदान ठरते. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट घटक त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात.

रात्रीच्या स्किन केअरचा प्रभाव अधिक का असतो? :
रात्री झोपण्याच्या आधी कोरफड जेलमध्ये काही घटक मिसळून लावल्यास फक्त 15 दिवसांत चेहऱ्यावर झळाळी येते. कारण रात्रीच्या वेळेस त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते आणि त्यावेळी लावलेली नैसर्गिक घटकयुक्त सामग्री प्रभावीपणे शोषली जाते.
रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझरची गरज अधिक असते.(lifestyle) दिवसभर प्रदूषण, ऊन आणि ताणामुळे त्वचा कोरडी होते. झोपेत असताना त्वचेत नवीन पेशी तयार होतात, त्यामुळे रात्री लावलेले उपाय त्वचा दुरुस्त करण्यात मोठी मदत करतात. त्यामुळे रात्री कोरफड जेलमध्ये काही नैसर्गिक घटक मिसळून लावल्यास उत्तम परिणाम मिळतात.

- मध : मध हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असून मुरुमांवर प्रभावी आहे. कोरफड आणि मध यांचे मिश्रण त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि तजेलदार ठेवते.
- हळद : हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कोरफड जेलमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग, चट्टे कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
- लिंबाचा रस : लिंबामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. यामुळे (lifestyle)चेहऱ्यावरील गडद डाग कमी होतात. कोरफड आणि लिंबू एकत्र करून वापरल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा एक्सफोलिएट होतो.
- गुलाबपाणी : गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते. कोरफडमध्ये मिसळल्यास हे मिश्रण चेहऱ्याला हायड्रेशन देतं आणि मुरुमं कमी करायला मदत करतं. रात्री टोनरप्रमाणे वापरता येऊ शकतं.
- नारळ तेल : कोरफड आणि नारळ तेल यांचे मिश्रण त्वचेला मॉइश्चर देतं आणि नैसर्गिक रूपाने संरक्षण देखील करतं. यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि पोषणयुक्त राहते.
हेही वाचा :
कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह
उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय? आताच सावध व्हा! नाहीतर…
‘रेखा फक्त पैसे न देणाऱ्यांसोबत.. राकेश रोशन यांनी उघड केला खरा चेहरा