मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडणाऱया आरोपी बिल्डर (builder)पुत्राच्या दिमतीसाठी येरवडा पोलिसांनी चांगली काळजी घेतली. अल्पवयीन आरोपीला बसण्यासाठी पोलिसांनी चक्क खुर्ची दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पिझ्झा-बर्गरची मेजवाणी दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
बिल्डर (builder)विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जाब विचारला. दरम्यान, मोटार चालविण्याचे प्रशिक्षण आणि वाहन परवाना नसतानाही अल्पवयीनाने श्रीमंतीच्या जोरावर मस्तवालपणे वाहन चालवून तरुणीसह दोघांना चिरडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आरोपीचे नातेवाईक चार ते पाच अलिशान मोटारीतून पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सोबत येताना 10 ते 15 पिझ्झा आणले होते. सर्व पिझ्झा अल्पवयीन आरोपीसह इतरांना देण्यात आले. मात्र, मीडियाची नजर पडताच, अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांसह पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांनी पिझ्झाचे बॉक्स लपविण्याचा प्रयत्न केला.
बिल्डर बाप, पब मालकासह मॅनेजरवर गुन्हा
मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान कार चालवून अल्पवयीन आरोपीने तरूणीसह दोघांना चिरडल्याप्रकरणी पुणे पोलिसांना संबंधिताच्या बिल्डर वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत त्याला मद्य पुरविणारा पब मालकासह मॅनेजरविरूद्धही येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद भुतडा (रा. येरवडा) सचिन काटकर, संदीप सांगळे जयेश बोनकर आणि विशाल अगरवाल (रा. वडगाव शेरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा :
भिवंडीत भाजप उमेदवाराचा बोगस मतदानाचा आरोप; म्हणाले….
आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं ‘मिशन 266’!
चांगला मान्सूनचा अंदाज असूनही कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत?