इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू

इराणचे राष्ट्राध्यक्ष(president) इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा इराणकडून आज करण्यात आली. रईसी यांच्यासमवेत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराबदुल्लाहियान आणि इतर अधिकाऱयांचाही मृत्यू झाला आहे. रविवारी अझरबैजानच्या सीमेवरील एका धरणाच्या उद्घाटन समारंभानंतर परतताना रईसी यांचे हेलिकॉप्टर संध्याकाळच्या वेळेस सीमेजवळील दुर्गम डोंगराळ जंगलामध्ये कोसळले होते.

रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन यांच्याशिवाय, अमेरिकन बनावटीच्या या बेल 212 हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षाप्रमुख आणि अंगरक्षक असे एकूण 9 जण होते. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांचे वारसदार मानले जाणारे रईसी यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर लगेचच मदत व शोध पथके या भागाकडे रवाना झाली होती, मात्र या भागातील दाट धुके, पाऊस आणि दुर्गम डोंगराळ प्रदेश यामुळे अपघातस्थळाकडे पोहोचणे अवघड झाले होते. हेलिकॉप्टर नक्की कुठे कोसळले याचाही अंदाज धुक्याने वेढलेल्या या भागात प्रारंभी येत नव्हता.(president)
रईसी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हिंदुस्थानात मंगळवार, 21 मे रोजी एक दिवसाचा सरकारी दुखवटा पाळण्यात येणार आहे. देशभरात ज्या इमारतींवर दररोज राष्ट्रध्वज फडकत असतो तिथे तो अर्ध्यावर उतरवण्यात येईल आणि या काळात कुठलेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

उपराष्ट्रपतींकडे हंगामी कार्यभार

रईसी यांच्या मृत्यूनंतर मंत्रिमंडळांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांनी रईसी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाचा अंतरिम कार्यभार सोपवला आहे. नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी जास्तीत जास्त 50 दिवसांच्या कालावधीत अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशही त्यांनी मोखबर यांना दिले. परराष्ट्र मंत्री हुसेन यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी उपपरराष्ट्र मंत्री अली बगेरी कानी यांची कार्यवाहक परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती मंत्रिमंडळाने केली आहे.

हेही वाचा :

आंबट-गोड चवीचे औषधी गुणधर्माचे जांभूळ; कोणते आहेत आरोग्यदायी फायदे?

भिवंडीत भाजप उमेदवाराचा बोगस मतदानाचा आरोप; म्हणाले….  

आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं ‘मिशन 266’!