गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन… आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर

प्रसिद्ध गायिका(singer) मोनाली ठाकूरसोबत लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गैरवर्तणूक झाली. यामुळे संतप्त मोनालीने कॉन्सर्टमध्ये गाणं थांबवत संबंधित व्यक्तीला सुनावलं. भर कॉन्सर्टमध्ये गर्दीतून एका श्रोत्याने मोनालीच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. ते ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली आणि तिने मध्येच गाणं थांबवलं.

शनिवारी 29 जून रोजी भोपाळच्या सेज युनिव्हर्सिटीमध्ये मोनालीच्या कॉन्सर्टचं(singer) आयोजन करण्यात आलं होतं. तिच्या कॉन्सर्टला तरुणांची फार गर्दी होती. स्टेजवर परफॉर्म करताना मोनाली अचानक थांबली आणि ती तिच्या टीमसोबत काही बोलू लागली. यानंतर तिने संताप व्यक्त केला.

मोनाली ठाकुर शनिवारी 29 जून रोजी भोपालमध्ये असलेल्या सेज यूनिव्हर्सिटीमध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचली होती. या कॉन्सर्टमध्ये कॉलेजच्या मुलांची खूप गर्दी झाली होती. पण तेव्हाच मोनालीला अचानक तिचं हे कॉन्सर्ट थांबवावं लागलं. त्यानंतर मोनाली तिच्या टीमला काहीतरी म्हणाली आणि संतापली.

मोनालीनं गर्दीत असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा केला आणि सांगितलं की त्यानं तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली. तिनं या सगळ्या प्रकरणाला शोषण म्हटलं आहे आणि सांगितलं की काही लोकं गर्दीत लपून कमेंट करतात. त्यानंतर मोनाली त्याला म्हणाली की तू खूप तरुण आहेस आणि या प्रकरणाची गोष्ट कोणाशीच करायला नको. मोनाली ठाकुरनं म्हटलं की ‘तिला अशा सगळ्या घटनांवर बोलायचं होतं, आता संधी मिळाली तर तिनं यावर वक्तव्य केलं.’

यानंतर जेव्हा संपूर्ण प्रकरण शांत झालं तेव्हा मोनाली ठाकुरचं कॉन्सर्ट पुन्हा सुरु झाला आणि सिंगरनं मग गाणं गायला सुरुवात केली. तर दुसरीकडे ज्या व्यक्तीवर तिनं आरोप लावले होते त्या व्यक्तीनं स्पष्टीकरण दिलं की त्यानं फक्त मोनालीच्या डान्स मूव्सवर कमेंट केली होती आणि काहीही आक्षेपार्ह्य सांगितलं नव्हतं. त्याचं म्हणणं आहे की काहीही नसताना मोनालीनं स्टेजवर त्याचं नाव खराब केलं.

मोनाली ठाकुर एक नॅशनल अवॉर्ड विनिंग सिंगर आहे. त्यानं आजवर अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘ये मोह मोह के धागे’, ‘सवार लूं’ आणि ‘जरा जरा टच मी’ ही गाणी आहेत. त्याशिवाय मोनाली रिअॅलिटी शोचे परिक्षण देखील करते. तर मोनालीला 2015 मध्ये नेशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का?

वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण

शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान