मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट(government) केला आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिंदे म्हणाले आहेत की, सरकार वाचवण्यासाठी आणखी काही लोकांना तुरुंगात टाकणार होते. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आधीच्या सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आताचे सरकार सूडबुद्धीने वागत नसल्याचं शिंदे म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे(government)म्हणाले की, ”आम्ही अशी सूडबुद्धीने कारवाई करत नाही. सूडबुद्धीने त्यांनी कंगना रणौत, अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांच्यावर कारवाई केली. नारायण राणे यांच्यावरही केली. हे केल्यानंतर आणखी काही लोकांना तुरुंगात टाकायचं आणि आपलं सरकार वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.”
दरम्यान, याआधी Times Of India या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केला होता की, ”मविआ सरकारचा देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता.”
उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ते म्हणाले होते की, ”उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचे होते. हे त्याचे स्वप्न होते. ज्या दिवशी 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी त्यांनी दावा केला की, त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री व्हायचे होते आणि मुख्यमंत्रीपद ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचे होते.”
शिवसेना आणि भाजप युतीबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, ”आम्ही (शिवसेना-भाजप) युती करून निवडणूक लढवली असल्याने आम्ही पुन्हा भाजपमध्ये जावे, असं मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो. यासाठी उद्धव ठाकरे यांनीही हो म्हटले होते. मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि आठ दिवसांत निर्णय घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी निर्णय घेण्याऐवजी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.”
हेही वाचा :
बच्चू कोणाला ‘कडू’? मैदानावरुन राडा, रडारवर राणा
कोल्हापूरात मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !
कोल्हापुर महापालिकेनं पीएम मोदी येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!