कोल्हापुर महापालिकेनं पीएम मोदी येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!

कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक(municipal corporation) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उद्या (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानात उद्या सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून(municipal corporation) पीएम मोदी येणाऱ्या मार्गावर झाडून पडून स्वच्छता करण्यात आली. पीएम मोदी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरून तपोवन मैदानाच्या दिशेने जाणार आहेत. यामधील विमानतळावरून मार्गस्थ झाल्याने ते शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक पुढे एसएससी बोर्ड ते पुढे हाॅकी स्टेडियम ते संभाजीनगर मार्गावरून तपोवन मैदानात दाखल होतील.

त्या मार्गावर कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने स्वच्छता करण्यात आली. तपोवन मैदानातून निर्माण चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरही आज (26 एप्रिल) डागडूजी सुरु होती. या मार्गावरून तपोवन मैदानातून विमानतळाकडे जाता येते. त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात रस्त्यांची डागडूजी हा कोल्हापूर मनपाच प्राधान्यक्रम नेहमीच दिसून आला आहे.

उद्या सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर विमानतळावर पोहचतील. सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन याठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर सभा पार पडल्यानंतर सायंकाळी 6.20 वाजता तपोवन मैदानावरून कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर 6.30 वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली आहे. काल गुरुवारीच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी आजपासून बंदोबस्त तैनात होणार आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतर नेते, कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि सभेच्या येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.

हेही वाचा :

बच्चू कोणाला ‘कडू’? मैदानावरुन राडा, रडारवर राणा

कोल्हापूरात मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !

क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात ‘कदमबांडे’ नावाची एन्ट्री