बच्चू कोणाला ‘कडू’? मैदानावरुन राडा, रडारवर राणा

अमरावती: महायुतीत असूनही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार(radar) नवनीत राणा यांच्या विरोधात असूनही बच्चू कडू यांनी वातावरण तापवलं. कडू यांनी त्यांच्या प्रहारचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं भाजप विरुद्ध काँग्रेस अशी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली. अमरावतीत आज मतदान सुरु आहे. कडूंच्या संघर्षाचा फायदा नेमका कोणाला होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं उत्तर ४ जूनला मिळेल.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या(radar) पाठिंब्यानं नवनीत राणा विजयी झाल्या. मात्र त्यानंतर त्यांनी राज्यातील बदलेलं राजकीय वातावरण पाहून भाजपला पूरक भूमिका घेतली. राजकीय हवा बघून तवा मांडण्यात पटाईत असलेल्या राणांनी पुढे जाईन सोयीस्कर भूमिका घेऊ नये म्हणून भाजपनं त्यांचा पक्षप्रवेश घडवला. मगच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. विशेष म्हणजे केवळ नवनीत राणांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पती रवी राणांनी युवा स्वाभिमान पक्षात राहून आपली वेगळी ओळख कायम ठेवत स्वतंत्रपणे राजकारण करण्याचा पर्याय खुला ठेवला.

राणा आणि बच्चू कडू यांच्यातलं राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. महायुतीत असलेल्या कडूंनी राणांच्या उमेदवारी तीव्र विरोध केला. आपण लाचार नसल्याचं म्हणत त्यांनी राणांसाठी काम करण्यास नकार दिला. दिनेश बूब यांच्या रुपात त्यांनी प्रहारचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. त्यामुळे काँग्रेसचे बळवंत वानखडे विरुद्ध भाजपच्या नवनीत राणा अशी वाटणारी लोकसभेची लढत तिरंगी झाली.

वानखडे विरुद्ध राणा यांच्यात थेट लढत झाली असती तर भाजपला बराच संघर्ष करावा लागला असता, अशी परिस्थिती होती. पण राणांच्या पराभवासाठी आपण उमेदवार देत असल्याचं म्हणत कडूंनी दंड थोपटले. अमित शहांच्या सभेआधी कडूंनी मैदान सोडण्यास नकार दिला. मैदानातच राडा झाला. पोलिसांसोबत संघर्ष झाला. त्यामुळे कडूंची बरीच चर्चा झाली.

बच्चू कडूंनी अमरावतीत भलीमोठी रॅली काढली. कडूंनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा भाजपला होऊ शकतो. कडूंच्या उमेदवारामुळे मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा अमरावतीत आहे. त्यामुळे कडू यांचा संघर्ष नेमका कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा :

‘..तर आम्ही भारत सोडू’, दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा

लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ…

क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात ‘कदमबांडे’ नावाची एन्ट्री